2 minutes reading time (331 words)

[ETV Bharat]संतोष देशमुख हत्याकांड; पुण्यात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मूक आंदोलन, 'या' चौकशीची मागणी

संतोष देशमुख हत्याकांड; पुण्यात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मूक आंदोलन, 'या' चौकशीची मागणी

पुणे : "बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा क्रूरपणा विविध माध्यमांतून समोर आला आहे. महाराष्ट्रात असं राक्षसी कृत्य घडूनही महाराष्ट्रातील सत्ताधारी केवळ स्वतःच्या मंत्र्यांची, त्यांच्या खुनी चेल्यांची कातडी वाचवण्यात व्यस्त आहे," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा निषेध व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात मंगळवारी मूक आंदोलन करण्यात आलं, यावेळी त्या बोलत होत्या.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या हत्याकांडातील फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संतोष देशमुख हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बालगंधर्व चौक इथल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा इथं हे मूक आंदोलन करण्यात आलं.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "या घटनेतील फोटो पाहिल्यानंतर माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे. 84 दिवस झाले, सातत्यानं नवीन गोष्टी समोर येत होत्या. बीडमध्ये 100-110 हत्या झाल्याचा उल्लेख वारंवार अनेकजण करत आहेत. या सगळ्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. 100 लोक गायब झाले आहेत, त्याची प्रत्येकाची फाईल उघडली गेली पाहिजे. जो कोणी या हत्यांमध्ये सहभागी आहे, त्या सगळ्यांना आरोपी केलं पाहिजे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे. खंडणी हा गुन्हा पीएएमएलमध्येच असतो, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मी इडी आणि सीबीआयकडं मागणी करणार आहे. सुरेश धस आणि अंजली दमानिया वारंवार सीडीआर काढा असं सांगतात. अवादा कंपनीमध्ये खंडणीची मागणी झाली, त्यामध्ये कोण कोण होतं हे सीडीआर बाहेर काढल्यानंतर समजेल. तसेच कृष्णा आंधळे कुठं आहे, त्याला अजून अटक का नाही केली. त्याचा सीडीआर का नाही बाहेर काढला जात. वाल्मिक कराड आणि त्याच्यामध्ये काय संबंध आहे. ज्यानं हा खून करताना साथ दिली त्या प्रत्येकाला शिक्षा मिळालीच पाहिजे," असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

...

संतोष देशमुख हत्याकांड; पुण्यात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मूक आंदोलन, 'या' चौकशीची मागणी

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी निषेध नोंदवत सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
[Lokmat]मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं...
[ABP MAJHA]धनंजय मुंडेंकडे नैतिकतेचा न पण नाही, रा...