1 minute reading time
(77 words)
[ABP MAJHA]धनंजय मुंडेंकडे नैतिकतेचा न पण नाही, राजीनाम्यानंतरच्या ट्वीटवरुन हल्लाबोल!
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून कालपासूनच राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिल्याची मोघम प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी तर अजित पवार यांचं म्हणणं खोडून काढत, अजित पवार यांना तोंडघशीच पाडलं आहे.