1 minute reading time (290 words)

[Navarashtra]‘निवडणुकींसाठी हा फक्त जुमल्यांचा पाऊस’

Preeti-Design-3-1

आकर्षक योजनांवरुन सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : राज्याच्या विधीमंडळामध्ये व लोकसभेमध्ये सध्या अधिवेशन सुरु आहे. लोकसभेचे नवीन सरकार आल्यानंतर पहिलेच अधिवेशन असून जोरदार गाजत आहे. तर विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारने माझी लाडकी बहीण अशी योजना जाहीर केली आहे. तसेच दर वर्षी 3 गॅस सिलेंडर देण्याचे देखील आश्वासन दिले आहे. मात्र या निर्णायांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारचे अधिवेशन म्हणजे निवडणुक पूर्वीचा जुमला असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, "सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे? याचा विचार सरकारने केला पाहिजे. ज्या प्रकारे सरकार कर्ज घेत आहे, निवडणूक समोर असल्याने सरकार फक्त जुमल्यांचा पाऊस पाडत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि पैसे वापरायचे, सत्तेत यायचे असे सुरु आहे. सरकारने गरीबांची मदत केली पाहिजे. पण किती कर्ज घ्यावे? आता बुलेट ट्रेन प्रोजेक्ट पाहा. बुलेट ट्रेन कोणीही मागितली नव्हती. या सर्वांचा विचार व्हायलाच पाहिजे. मला तरी हा अर्थसंकल्प पाहून काहीही आश्चर्य वाटलं नाही", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

अजित पवार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अर्थसंकल्पावर केल्या जाणाऱ्या टीकेवर उत्तर दिले. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अजित पवार यांच्यावरील भ्रष्ट्राचाराच्या आरोपावर महाविकास आघाडी उत्तर देऊ शकत नाही, तर महायुतीने उत्तर दिलं पाहिजे. कारण अजित पवार यांच्यावर आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनी अजित पवारांवर आरोप केले. त्यामुळे याचं उत्तर त्यांनाच विचारलं पाहिजे", असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. 

...

‘निवडणुकींसाठी हा फक्त जुमल्यांचा पाऊस’; आकर्षक योजनांवरुन सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खसादार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. अर्थसंकल्प म्हणजे निवडणूकीच्या आधीचा जुमला असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
[Saamana]भ्रष्टाचाराचे आरोप मोदी, फडणवीस यांनीच के...
[Lokshahi Marathi]सुजाता सौनिकांनी मुख्य सचिव पदाच...