1 minute reading time
(87 words)
[TV9 Marathi]निष्क्रिय आणि असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते- सुप्रिया सुळे
मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, म्हणजे या पुतळ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, हे उघड आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मालवण किल्ल्यावर आठ महिने 22 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. पण आज सोमवारी (ता. 26 ऑगस्ट) हा पुतळा कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ज्यानंतर देशभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता खासदार सुळे यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.