1 minute reading time (182 words)

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक, शालोपयोगी वस्तूंचे वाटप

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक, शालोपयोगी वस्तूंचे वाटप

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुस्तक तुला, सोशल मीडियावरुन केले होते आवाहन


राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवशी शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तकांचे वाटप करावे असे आवाहन केले होते. सुप्रिया सुळेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी त्यांची पुस्तक तुला केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त करत असतात. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा मला देण्यासाठी उत्सुक आहेत. याची मला जाणीव आहे. मी सर्वांना एकच नम्र आवाहन करू इच्छिते की, शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदींचे वाटप करावे. या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करेन. आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण हा गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, माझ्यासाठी वाढदिवसाची हीच अनमोल भेट ठरेल. सुळेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी त्यांची पुस्तक तुला केली.

[ABP MAJHA]राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत गांभीर्य...
[लोकसत्ता]“आंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात, कुण...