1 minute reading time (108 words)

[TV9 Marathi]'दिल्लीच्या अदृष्यशक्तीचं महाराष्ट्राविरोधात कटकारस्थान'- सुप्रिया सुळे

'दिल्लीच्या अदृष्यशक्तीचं महाराष्ट्राविरोधात कटकारस्थान'- सुप्रिया सुळे

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची साताऱ्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. यासोबतच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला."निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार स्वत: गेले होते. मला गंमत अशी वाटली, ज्यांना पक्ष हवाय त्यांचं कोणीच नव्हतं. ज्यांनी पक्षाला जन्म दिला तो तिथे मात्र पाच तास बसून होता. लक्षात ठेवा मी एक आई आहे. दहा मुलं रडली तरी आपल्या मुलाचा सूर आईला माहिती असतो. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचं नातं आहे. कुणीही काहीही काढू द्या किंवा अदृश्य शक्ती येऊद्या. त्याचा मायबाप एकच आहे, त्याचं नाव शरद पवार आहे", असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

[ABP MAJHA ]ट्रीपल इंजिनला मराठा आरक्षणाबद्दल काही...
[ABP MAJHA]माझी लढाई फक्त भाजपाविरोधात, शिंदे-दादा...