1 minute reading time (257 words)

[Loksatta]“उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला”

राज्यपालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राज्यपालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "कोणत्याही देशात.."

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मान्य केला आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला, ते अतिशय दुर्देवी असून, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाले नाही. कोणत्याही देशात किंवा राज्यात महापुरुषांचा अपमान करणे हे अयोग्य आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी तेच पाप केल. उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त विधान केल्याने मागील काही महिन्यांपासून ते चर्चेत होते. राज्यपालांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनेदेखील झाली होती. यादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करावे, अशी मागणी केली होती. ती मागणी राष्ट्रपतींनी मान्य केली असून, रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "देर आये दुरुस्त आये", उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाल्याचे त्या म्हणाल्या.

रमेश बैस यांची महाराष्ट्रचे म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मी त्यांना शुभेछा देते आणि त्यांना नक्की भेटण्यास जाणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी पारदर्शक काम करावे आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम करावे, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

...

"उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला, कोणत्याही देशात..", राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | Supriya Sule on Governor Koshyari resignation in pune progrm | Loksatta

"उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला, कोणत्याही देशात..", राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | Supriya Sule on Governor Koshyari resignation in pune progrm
[TV9 Marathi]भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर...
[Hindustan Times]आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झाले...