2 minutes reading time (336 words)

[Hindustan Times]आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्या

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्या

 Supriya Sule On Pradnya Satav attack : काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

NCP MP Supriya Sule On Pradnya Satav Attack: काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी हिंगोली जिल्ह्यात हल्ला झाला. याप्रकरणी प्रज्ञा सातव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रज्ञा सातव यांनी बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर अतिशय निर्घृण असा हल्ला झाल्याची माहिती दिली. "कळमनुरी येथील कसबे धवंडा येथे हा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला.मला गंभीर इजा पोहोचवण्याचा या हल्ल्याचा प्रयत्न होता. एका महिला आमदारावर झालेला हा हल्ला एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे. समोर येऊन वार करा असे भ्याडपणे मागून हल्ला करु नका" अशा शब्दात प्रज्ञा सातव यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले. "विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर कसबे धवंडा, ता. कळमनुरी येथे झालेला हल्ला ही मोठी गंभीर बाब आहे. एका महिला लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला होतो हे खेदजनक आहे", अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपली प्रितिक्रिया दिली आहे.

याशिवाय, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या घटनेवर निषेध नोंदवला. "कळमनुरीमध्ये आमदार प्रज्ञा ताई सातव यांच्यावरील हल्ल्याची घटना अत्यंत गंभीर आणि राज्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यातील आरोपीला तातडीने गजाआड करून हल्ल्यामागील सूत्रधार पोलिसांनी पुढं आणावा आणि प्रज्ञाताई यांना पुरेशी सुरक्षा पुरवावी, ही विनंती, असे रोहित पवार यांनी म्हटलंय.

...

Supriya Sule : आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्या-ncp mp supriya sule on pradnya satav attack

Supriya Sule On Pradnya Satav attack : काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
[Loksatta]“उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळा...
[Lokmat]एटीकेटी धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्...