1 minute reading time (295 words)

[timemaharashtra]बॅंकांचा पैसा सर्वसामान्य जनतेचा- सुप्रिया सुळे

बॅंकांचा पैसा सर्वसामान्य जनतेचा- सुप्रिया सुळे

बँकांमधील घोटाळे, सर्वसामान्य जनतेची होणारी फसवणूक आणि त्यांना न मिळणारा न्याय यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केले आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सुप्रिया सुळे या विषयावर व्यक्त झाल्या आहेत. केंद्र सरकारचे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या आर्थिक गुन्हेविषयी सक्रिय असणाऱ्या संस्थांना चुकवून गुहेगार पळून जातात. याविषयी सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला आहे. बँकेत अनेक प्रकारचे घोटाळे होतात, ते घोटाळे करणारे आरोपी पळून जातात, या सर्व गोष्टींची खबरबात असूनही शासनाकडून सर्वसामान्यांना योग्य तो न्याय मिळत नाही, त्यावर काही तोडगा काढला जात नाही. अशा असायची पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

बॅंकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन परदेशात पळून गेलेल्या एकाही व्यक्तीला हे सरकार परत आणून वसूली करु शकले नाही. आता गुजरातमधील विजय शाह आणि आणखी एका भामट्याने सुरत येथील बॅंकेचं शंभर कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पलायन केले. ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकारच्या ईडी(ED), इन्कमटॅक्स (Income Tax), सीबीआय (CBI) (ICE) यांसारख्या आर्थिक गुन्हेविषयक अतिसक्रीय संस्थांच्या नाकावर टिच्चून हे बॅंकबुडवे पळून गेले. आणि या संस्थांना यांची काहीच खबर लागली नाही, हे निश्चितच पटण्यासारखे नाही. केंद्र सरकारने या संस्था केवळ विरोधकांवर छापे टाकून त्यांना बदनाम करण्यासाठी पाळल्या आहेत का? कोट्यवधी रुपयांचे बोगस व्यवहार होत असताना याची शासनाच्या एकाही यंत्रणेला खबरही लागत नाही हे पटण्यासारखे नाही. बॅंकांचा पैसा हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. शासनाने तातडीने या व्यक्तींना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

...

Banks' Money Belongs To Common People Supriya Sule

बँकांमधील घोटाळे, सर्वसामान्य जनतेची होणारी फसवणूक आणि त्यांना न मिळणारा न्याय यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केले आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सुप्रिया सुळे या विषयावर व्यक्त झाल्या आहेत. केंद्र सरकारचे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या आर्थिक गुन्हेविषयी सक्रिय असणाऱ्या संस्थांना चुकवून गुहेगार पळून जातात. याविषयी सुप्रिया सुळेंनी
[politicalmaharashtra]“मोदींच्या काळात भारतीयांवर ...
[loksatta]“गुजरातमधील एका भामट्याने…”