2 minutes reading time (304 words)

[politicalmaharashtra]“मोदींच्या काळात भारतीयांवर १७३ लाख कोटी इतका कर्जाचा बोजा,”

“मोदींच्या काळात भारतीयांवर १७३ लाख कोटी इतका कर्जाचा बोजा,”

सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई : संयक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जगभरातील सरकारी कर्जामध्ये तब्बल पाच पटींनी वाढ झाली आहे. विशेष:त विकसनशील देशांमधील कर्जाचे वास्तव अधिक काळजीत टाकणारे आहे. सुमारे ५९ विकसनशील देशांमधील कर्जाचे जीडीपीशी असणारे गुणोर्तर ६० टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे या देशांना प्रंचड आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

सोंग कशाचंही आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात. आर्थिक परिस्थितीचं कोंबडं कितीही डालून ठेवलं तरीही ते आरवल्याशिवाय राहत नाही. भारताच्या आर्थिक स्थितीची हिच अवस्था आहे. सन २०१४ साली ५५ लाख कोटी रुपयांचं कर्ज भारताच्या डोक्यावर होतं मात्र २०२३ संपता संपता हा आकडा दुपटीपेक्षा जास्त होऊन १७३ लाख कोटी इतका झाला. भाजपाने २०१४ साली देशावरील कर्ज हा निवडणूकीचा मुद्दा बनविला होता. हे कर्ज सारुन अच्छे दिन आणू हा वायदा त्यांनी केला होता. आता भाजपाने या १७३ लाख कोटी रुपयांच्या कर्जाबाबत खुलासा करावा. यासोबतच देशाला दिलेले वचन पुर्ण करु शकलो नसल्याची कबुली देऊन माफी मागावी. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जागतिक बॅंकेने गतवर्षी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील ७५ गरीब, अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये श्रीलंकेसारखी आर्थिक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती. चीनने गेल्या दशकामध्ये साधारणत: 10 ट्रिलियन डॉलर्स इतक्या प्रंचड रकमेचे कर्ज १०० हून अधिक देशांना दिलेले आहे.

...

"मोदींच्या काळात भारतीयांवर १७३ लाख कोटी इतका कर्जाचा बोजा," सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल - Political Maharashtra

सोंग कशाचंही आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात. आर्थिक परिस्थितीचं कोंबडं कितीही डालून ठेवलं तरीही ते
[TV9 Marathi]मनीषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांनंत...
[timemaharashtra]बॅंकांचा पैसा सर्वसामान्य जनतेचा-...