1 minute reading time (219 words)

[maharashtratimes]अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन

अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन

सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एकेकाळचा सुपरस्टार अमिताभ बच्चन सर्वांना सगळ्याच सिनेमात हवा असतो. अमिताभ यांचा आवाज, फोटो, लूक आणि ऑटोग्राफही चालतो. त्याच धर्तीवर अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले. महिलांबाबत केंद्र व राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करून, मुंबईसह राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांना राज्याचे गृह खाते जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा म्हणून निवड झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे प्रथमच मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये आल्या असताना, त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करून स्वागत केले. त्यानंतर खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वरील विधान केले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. मी अजूनही लोकशाहीत जगत आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी टीका करणाऱ्या खासदारांना दिले आहे. पक्षातील कामाचे विभाजन हे स्पष्ट असून, माझा मतदारसंघ महाराष्ट्रात असल्यामुळे या राज्यातील संघटनेची जबाबदारी माझ्यावर आली आहे. सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर नसून, टीमवर्क म्हणून आम्ही देशात काम करीत आहोत. लोकसभेच्या तयारीला राष्ट्रवादीने कधीच सुरुवात केली असून, अनेक बैठकी झाल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीत या चर्चा घेतल्या जातील, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

[saamtv]अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन
[loksatta]“अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अ...