1 minute reading time (256 words)

[loksatta]“अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन, त्यामुळे…”

“अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन, त्यामुळे…”

केसरकरांच्या 'त्या' ऑफरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

 शिवसेना ( शिंदे गट ) नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे. आम्हाला अपेक्षा आहे, अजित पवारांनी सरकारमध्ये यावं. ते सरकारमध्ये आले, तर आनंद होईल, असं केसरकरांनी म्हटलं.

नेमकं काय म्हणाले केसरकर?

राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्यावर बोलताना केसरकरांनी सांगितलं की, "अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे. अजित पवार विरोधी पक्षाचे नेते आहेत, किमान त्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत. संजय राऊत रोज बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण, अजित पवार बोलतात तेव्हा जनता ते गांभीर्याने घेते. त्यामुळे सामाजिक ऐक्य राखण्यासाठी अजित पवार आमच्याबरोबर आघाडीवर असतील."

"राष्ट्रवादीत अजित पवारांबरोबर काय होतं, हे…"

"अजित पवार यांनी सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे. अजित पवार कार्यक्षम नेते असून, त्यांच्या कामाचा फायदा राज्याला झाला पाहिजे. राष्ट्रवादीत त्यांच्याबरोबर काय होतंय, हे सर्वांना माहिती आहे," असं केसरकरांनी म्हटलं. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

"…त्यात चुकीचं काय आहे"

"अमिताभ बच्चन सर्वच सिनेमात हवे असतात. त्यांच्या आवाज, फोटो, लूक आणि सही सुद्धा चालते. तसेच, अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे चुकीचं काय आहे," असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

[maharashtratimes]अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारण...
[ABP MAJHA]केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत ...