[maharashtradesha]राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करताय? – सुप्रिया सुळे
Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अटक केल्यानंतर हे प्रकरण अत्यंत पेटलं आहे. अशात आता पैठण सारख्या शहरामध्ये 250 कोटींचं ड्रग्स सापडलं आहे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करत आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, "राज्यात विविध ठिकाणी ड्रग्स सापडत आहे, हे राज्य सरकारचं मोठं अपयश आहे. हे मी वारंवार सांगत आहे.
राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करत आहे? हा एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र होणार आहे, असं संजय राऊत म्हणतात.
महाराष्ट्रमध्ये नक्की चाललंय तरी काय? या सर्व प्रकरणामध्ये गृहमंत्र्यांचं लक्ष नाही. राज्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे."
दरम्यान, या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "पैठण सारख्या छोट्या शहरात 250 कोटींचे ड्रग्स सापडले आहेत. हे भयावह आहे.पैठण ही आध्यात्मिक नगरी आहे.
याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात जर ड्रग्स सापडणार असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रमाण किती असेल..? याचा विचार करूनच अंगावर काटा येतो.मागील अधिवेशनात मी ड्रग्स संदर्भात भूमिका मांडत यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.परंतु या ट्रिपल इंजिन सरकारला बहुतेक उडता पंजाबच्या धर्तीवर उडता महाराष्ट्र बनवायचा आहे,अस वाटत आहे.या राज्यातील तरुणाई मोठ्या संकटात आहे."