राष्ट्रवादीत फूट, यंदा पवारांची यंदाची दिवाळी कशी साजरी होणार?
क्षणाचाही विलंब न करता सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या...
पुणे : राष्ट्रावदीत फुट पडल्यापासून पवार कुटुंबियांमध्येही (Supriya Sule) फूट पडली आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यातील विविध विषयांवर आणि पक्षाच्या भूमिकेवर अनेकदा सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये शाब्दित वादावादी बघायला मिळाली. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आता पवार कुटुंबियांचं काय होणार? त्यांचे सण कसे साजरे होतील. या सगळ्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळेंनी पूर्णविराम दिला आहे. पवारांची दिवाळी काल एकत्र होती आजही आहे आणि उद्याही एकत्र होईल, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी कुटुंब एकत्र असल्याचं बोलून दाखवलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील माळावरच्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकीय मतभेद आमचे जरूर झालेत जेव्हा राजकीय लढाया असेल त्यावेळेस आम्ही संपूर्ण ताकतीने लढू परंतु कुटुंब जबाबदारी काही असते की नाही. त्यामुळे कुटुंबातील जबाबदारी नीट पार पाडू. पवारांची दिवाळी काल एकत्र होती आजही आहे आणि उद्याही एकत्र होईल. देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी घरात नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातो तेदेखील सांगितलं आहे. शारदाबाई पवार आणि माझी आई या नऊ दिवसाच्या उपवास करतात.आजही माझी आई नवरात्राचा उपास करते. त्यांची या देवीवर श्रद्धा आहे त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी दर्शन घेतल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणती फुट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत.आमच्यातले काही सहकारी वेगळ्या विचाराच्या पक्षासोबत काम करतात. ही आमची कायदेशीर लढाई आम्ही कायदेशीर लढाई लढतोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
येत्या (22 ऑक्टोबर) रविवारी अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यावर सुप्रिया सुळे यांना विचारल्यास त्या म्हणाल्या की, विद्या प्रतिष्ठान एक संस्था आहे. त्याची स्थापना पवार साहेबांनी केली. विद्या प्रतिष्ठान एक सामाजिक जबाबदारी आहे आणि आमच्या कुटुंबातील सगळी लोकं ही सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. हा राजकीय विषय नाही तर सामाजिक विषय असल्याने कृपया गल्लत करू नये, असं त्यांनी खडसावलं आहे.