2 minutes reading time (489 words)

[Navarashtra]सामान्यांकडून टॅक्स वसुली तर मंगेशकर रुग्णालयाला सूट

सामान्यांकडून टॅक्स वसुली तर मंगेशकर रुग्णालयाला सूट

पालिकेच्या कारभारावर खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे : पुण्यामध्ये अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणाऱ्या घटना घडल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात रुग्णालयाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 10 लाखांची मागणी करत उपचारांसाठी दिरंगाई केल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांकडून देखील या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे दौरा करुन सर्व पाहणी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे दौरा करत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "पुणे मनपा सरकारी कार्यालयातील कामाचा मी आढावा घेतला. बजेट संपले आहे, त्याअगोदर झालेल्या काही प्रश्नांचे केंद्र सरकारकडून फॉलो अप घेतला आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील ही घटना दुर्दैवी आहे. हॉस्पिटलने साधा टॅक्स पण भरलेला नाही. सामान्य माणसांकडून टॅक्स भरायचा राहिला लोकांची बॅन्ड वाजवताय. आणि इथं हॉस्पिटल देत नाही. याचं पुढे मनपाने काहीही केलं नाही. मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झालीच पाहिजे . दुर्दैव आहे की मंगेशकरसह बीड परभणी केसमध्ये असंवेदनशील कारभार सुरू आहे. या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर राजकारण न करता कारवाई करावी," अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी आता प्रेस झाल्यानंतर (दीनानाथ मंगेशकर पीडित) भिसे कुटुंबियांना भेटणार आहे. पोलिसाचे असे का सुरू आहे हेच काही कळत नाही. बीड, परभणी, पुणे अशा शहरात असं का होत आहे? सगळा आरोप सारखा पोलिसांवर का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तसेच एका हॅास्पिटला एक कायदा आणि इतरांना एक कायदा का? इतर जण कोटींमध्ये टॅक्स राहतो, सर्वांना नियम कायदा सारखा असला पाहिजे. टॅक्सबाबत ही आपण सरकार स्टँड पाहिले आहे. शेतकऱ्यांबाबत आता स्टँड आपण सर्वांनी पहिला आहे. 25 गावांबाबत अजूनही टॅक्स नियमावली नाही, पुण्याच्या अनेक भागात अनेक समस्या आहेत. मला आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत. पण डेटा हवा," असे मत खासदार सुळेंनी व्यक्त केले.

त्याचबरोबर पुणे महानगर पालिकेकडून शहरामध्ये समान पाणी योजना राबवली जात आहे. पालिकेकडून शहरातील अनेक भागांमध्ये झोन प्रमाणे मीटर बसवण्यात आले आहे. या मीटरप्रमाणे पाण्याचे भाडे आकारण्यात येणार आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "पाणी प्रश्न सगळीकडे आहेतच. पुणे मनपाने खडकवासला धरण स्वच्छ करावे. आजुबाजूचा परिसर स्वच्छ करावा. सर्व नागरिकांना पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि सरकारला आमची विनंती आहे की एक पाण्याचा डीपीआर बनवला पाहिजे. तसेच मेट्रो सगळीकडे व्यवस्थित झाली पाहिजे. त्याचीही आज बैठक झाली. मेट्रो होऊनही वाहतूक सुरळीत होत नाही. ५ हजार बसेसची पुणे शहराला तातडीने गरज आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पार्किंग प्रश्नावर ही तोडगा निघाला पाहिजे. या सगळ्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारमधील मंत्र्यांनाही भेटणार आहे," अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

...

Supriya Sule : सामान्यांकडून टॅक्स वसुली तर मंगेशकर रुग्णालयाला सूट; पालिकेच्या कारभारावर खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल-Navarashtra (नवराष्ट्र)- Marathi News | supriya sule pune tour on deenanath mangeshkar hospital case

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचा दौरा केला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने टॅक्स न भरल्यामुळे खासदार सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. Maharashtra News : Find Maharashtra Political News,Breaking News, Sports News Current & Maharashtra Local News in Marathi.
[News18 Lokmat]काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? सु...
[My Mahanagar]मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जातो...