1 minute reading time (98 words)

[Lokshahi Marathi]शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसमधील कधीकाळी टॉप दोन नेते असलेले शरद पवार आणि अजित पवार आता वेगळे झाले आहेत. अजित पवार यांनी वेगळी वाट धरली आहे. अजित पवार राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेसोबत गेले. परंतु शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहिले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. त्यानंतर अजित पवार यांनीही उत्तर सभा घेतल्या. यामुळे एका कुटुंबातील असलेले हे दोन्ही नेते राज्यात चर्चेचा विषय ठरलेले असतात. शुक्रवारी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. पुणे शहरात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी सर्व जण एकत्र आले.

[Maharashtra Times]अजितदादांसोबतच्या भेटीनंतर काय ...
[TV9 Marathi]आमची वैयक्तिक लढाई कुणाशी नाही, अजित ...