1 minute reading time (89 words)

[ABP MAJHA]रमेश बिधूरी ते अजितदादा; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

रमेश बिधूरी ते अजितदादा; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

पुण्यातील मानाचा पहिला, कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना गणरायाने केंद्र आणि राज्य सरकारला जनतेसाठी काम करण्याची सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नुकतेच भाजपा खासदाराने संसदेत अतिशय असभ्य वर्तन करुन संसदिय कार्यपद्धतीला काळीमा फासण्याचे काम केले. अशा पद्धतीने आपला असंस्कृतपणा भाजपाच्या खासदाराने भर सभागृहात उघड केला,असे सांगितले. सभागृहात बोलताना मी पंतप्रधान महोदयांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. यामध्ये कोणाच्याही वैयक्तिक चौकशीचा विषय नाही. पंतप्रधान महोदयांनी केलेले आरोप गंभीर आहेत. एकतर त्यांनी त्याची चौकशी करावी किंवा बेछूट आरोप केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली.

[politicalmaharashtra]“भाजपाच्या सोबत असाल तर चौकश...
[maharashtradesha]भाजप मराठी पक्ष आणि माणसांच्या व...