1 minute reading time (260 words)

[politicalmaharashtra]“भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात अन् विरोधात बोलाल तर…,”

“भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात अन् विरोधात बोलाल तर…,”

सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या

पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. सलग दोन दिवस सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यामुळे अजित पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी राजकीय लढाई सुरू झाली की काय ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित गेला केला. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. परंतु त्यांचा प्रवेश भाजपमध्ये झाल्यास त्यांनी केलेले आरोप गायब होतात. यामध्ये भाजप दुपट्टीपणा करतांना दिसत आहेत. भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात. पण विरोधात बोलाल तर एजन्सीजच्या माध्यमातून त्रास दिला जातो. माझ्या तीन बहिणींच्या घरावर एजन्सीच्या धाडी घालण्यात आल्या. त्यांचा राजकारणाशी दूरपर्यंत संबंध नाही. त्यांच्या घरापर्यंत एजन्सीज् गेल्या. त्यांच्यावर धाडी कशासाठी? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला आहे.

दरम्यान, माझ्या बहिणी आहेत म्हणून बोलत नाही तर अनिल देशमुख असोत, संजय राऊत किंवा नबाबभाई यांच्या घरातील महिलांना भाजपाच्या या राजकारणापायी नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे त्या घरातील आई, बहिणी, मुली, सुना यांना काय सहन करावं लागत असेल याची कल्पनाच न केलेली बरी ! भाजपा सोबत असले की स्वच्छ आणि भाजपा विरोधात बोलले की भ्रष्ट असा जो काही प्रकार भाजपाने चालविला आहे तो वाईट आहे. भाजपाने एजन्सीजचा हा खेळखंडोबा आता थांबविला पाहिजे. असंही त्या म्हणाल्या.

...

"भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात अन् विरोधात बोलाल तर...," सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या - Political Maharashtra

भाजप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. परंतु त्यांचा प्रवेश भाजपमध्ये झाल्यास त्यांनी केलेले आरोप गाय
[tv9marathi]मराठी पक्षांच्या आणि मराठी माणसाच्या व...
[ABP MAJHA]रमेश बिधूरी ते अजितदादा; सुप्रिया सुळे ...