1 minute reading time (284 words)

[maharashtradesha]भाजप मराठी पक्ष आणि माणसांच्या विरोधात कटकारस्थान करतयं – सुप्रिया सुळे

भाजप मराठी पक्ष आणि माणसांच्या विरोधात कटकारस्थान करतयं – सुप्रिया सुळे

Supriya Sule | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. मराठी पक्ष आणि मराठी माणसांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कटकारस्थान करत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार किंवा मी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंख्य कार्यकर्त्यांनी उभा केला आहे.भारतीय जनता पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना विरोधात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात कटकारस्थान करत आहे. त्यामुळे ही आता वैयक्तिक लढाई नसून पक्षाची आणि विचारधारेची लढाई आहे." यंदा राज्यामध्ये अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. मात्र, गणरायाचं आगमन झाल्यापासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर देखील भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, "मला सध्या फक्त देवाचे आभार मानायचे आहे. देशात आणि महाराष्ट्रात आतापर्यंत खूप कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. देशात आणि राज्यात चांगला पाऊस पडू दे एवढंच माझं देवाला मागणं आहे.

पुरेसा पाऊस न पडल्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे, त्याचबरोबर देशात वाढत चाललेली महागाई आणि बेरोजगारी कमी होऊ दे, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती दूर होऊ दे, केंद्र आणि राज्य सरकारला सुबुद्धी लाभू दे, एवढंच माझं देवाकडे मागणं आहे."

...

Supriya Sule | भाजप मराठी पक्ष आणि माणसांच्या विरोधात कटकारस्थान करतयं - सुप्रिया सुळे

Supriya Sule | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विरोधकांनी
[ABP MAJHA]रमेश बिधूरी ते अजितदादा; सुप्रिया सुळे ...
[tv9marathi]‘या’ खासदारावर हक्कभंगाची कारवाई करा