1 minute reading time (253 words)

[Navarashtra]खासदार सुप्रिया सुळेंनी घेतले पालखीचे दर्शन; वाढदिवशी घेतले आशिर्वाद

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतले पालखीचे दर्शन; वाढदिवशी घेतले आशिर्वाद

पुणे : पुण्यामध्ये आज संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. काल आळंदीमधून तर शुक्रवारी देहूमधून पालखीचे प्रस्थान झाले. यानंतर शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत. पती सदानंद सुळे यांच्यासह त्यांनी पालखीचे दर्शन घेतले. आज सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस देखील आहेत. त्यांनी वाढदिवशी दर्शन घेत आशिर्वाद घेतले. 

पालखीचे दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण अन् भाऊ सगळं आठवायला लागलं. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय. मागील सव्वावर्षापासून राज्याच्या गृह विभागाचा कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघात प्रकरणात बरेच घोळ झाल्याचे आपण बघितलं. बीडमधील तणावग्रस्त परिस्थिती हे गृह विभागाचे अपयश असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

पुण्यामध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या येणार आहेत. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत पालखीचा हा शेवटचा विसावा असून यानंतर तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीची संगमवाडी या ठिकाणी भेट होईल. बोपोडीमध्ये पुणे पालिकेकडून पालख्यांचे दिमाखात स्वागत करण्यात येणार आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील. त्यामुळे पुण्यामध्ये वैष्णवांचा मेळा जमला असून चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.

...

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतले पालखीचे दर्शन; वाढदिवशी घेतले आशिर्वाद

पुण्यामध्ये संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखींचे आगमन होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पतीसह पालखीचे दर्शन घेतले आहे.
[Zee 24 Taas]Ajit Pawar यांच्या व्हिडिओतील घड्याळ ...
[Dainik Prabhat]सुप्रिया सुळेंनी घेतलं तुकाराम महा...