1 minute reading time
(235 words)
[Dainik Prabhat]सुप्रिया सुळेंनी घेतलं तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन
राज्य सरकारवर केली सडकून टीका, म्हणाल्या
| महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यातच यंदाच्या वारीमध्ये राजकारणी देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील वारीमध्ये दाखल होणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आलं होत. आज पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं मनोमिलन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला सुखावू दे ही प्रार्थना, विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय. सरकारकडून वारकरी यांच्या दिंड्याला दिले जाणार अनुदान केवळ जुमला आहे तीन महिन्यावर निवडणुका आल्यामुळे सरकार काय काय देईल हे आता बघावे लागेल. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या गृह विभागाच्या कारभार बिघडला आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. बीड मधील तणावग्रस्त परिस्थितीवर सुप्रिया सुळे यांच वक्तव्य ,गृह विभागाच अपयश म्हणत निशाणा साधला. तसेच एक भारतीय म्हणून वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद आहे मात्र सगळे श्रेय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच आहे. असं देखील त्या यावेळी बोलत होत्या. | |

