[LetsUpp Marathi]माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत- सुप्रिया सुळे
अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा', अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. मला संघटनेतील कोणतंही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईन, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सूचक वक्तव्य केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे. मला मनापासून आनंद हे की, दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमधे उत्साह संचारला आहे. दादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हेच बहीण म्हणून मला वाटते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. त्यामुळे अजित पवार यांना खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एखादी नवी जबाबदारी मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.