1 minute reading time (299 words)

[ABP MAJHA]फडणवीस अपयशी गृहमंत्री, आरक्षणासाठीचे 40 दिवस सांगून जरांगे पाटलांची फसवणूक केली

sddefault-27

सुप्रिया सुळे कडाडल्या...

पुणे :पुणे बंगळूरु महामार्गावर जाळपोळ करण्यात (Maratha Reservation Protest) आली आहे. सोबत राज्यभर मरठा समाज आक्रमक झाला आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याकडे लक्ष नाही. ते दुसऱ्या राज्याच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. या सगळ्या परिस्थितीसाठी देवेंद्र फडणवीस जाबबदार आहेत आणि आरक्षणासाठी 40 दिवस सांगून सरकारने जरांगे पाटलांची फसवणूक केली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पुण्यातील नवले पुलाजवळ मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ही परिस्थिती पाहून सुप्रिया सुळेंनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

नवले पुलाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे. त्यासाठी मी सर्वांना शांततेचं आवाहन करेन. राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हे गृहमंत्री देवेंद्र फ़डणवीसांचं अपयश आहे. आताच नाही तर जालन्याच्या घटनेपासून हे सुरू आहे. जालना, बीड नंतर ड्रग्स, प्रकरणदेखील समोर आलं आहे. मात्र हे सरकार ईडी, सीबीआय, पक्ष फोडणे, घरं फोडण्यात व्यस्त आहे. सामान्यांसाठी या ट्रिपल इंजिन अणि खोके सरकारला वेळ नाही आहे. सरकारने जरांगे पाटलांना 40 दिवस सांगून जरांगे पाटलांची फसवणूक केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत समाज यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेकदा म्हणाले. त्यांनी प्रस्ताव आणावा, अल्ल पार्टी मीटिंग बोलवा, आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत. ट्रीपल इंजिन सरकारने राजीनामा दिला पाहिजे. सध्य़ाची राज्यातली परिस्थिती बघितली तर गृहमंत्री या सगळ्यांला जबाबदार आहेत. मुख्यमंत्री यांनी 40 दिवसात देऊ, असा शब्द दिला. सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं. त्यांनी खोटं कशाला बोलायचं? त्यांनी चारही समाजाची फसवणूक केली.

...

Supriya Sule Statement On Maratha Reservation And Devendra Fadanvis | Supriya Sule : फडणवीस अपयशी गृहमंत्री, आरक्षणासाठीचे 40 दिवस सांगून जरांगे पाटलांची फसवणूक केली; सुप्रिया सुळे कडाडल्या...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याकडे लक्ष नाही. ते दुसऱ्या राज्याच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यस्थ आहे, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
[maharashtralokmanch]खासदार सुप्रिया सुळे बसणार उप...
[lokmat]"प्रवाशांची सुरक्षा धोक्यात