1 minute reading time
(81 words)
[Mumbai Tak]विजयानंतर सुप्रीया सुळे काय बोलणार, पुण्यात पत्रकार परिषद
सुप्रिया सुळे यांचं पुण्यात जंगी स्वागत करण्यात आलं. गुलाल उधळत आणि ढोल ताशाच्या गजरात सुप्रिया सुळेंच्या विजयाचा जल्लोषही यावेळी साजरा करण्यात आला. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केलं. सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी विजयाच्या घोषणाही देत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. निकालानंतर सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदा पुण्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी मतदारांचे आभारही मानले.