1 minute reading time (84 words)

[TV9 Marathi ]'राज्यातील गद्दार सरकारची 20 तारखेला वर्षपूर्ती सांभाळून राहा'

[TV9 Marathi ]'राज्यातील गद्दार सरकारची 20 तारखेला वर्षपूर्ती सांभाळून राहा'

सुप्रिया सुळेंचा टोला

पुणे - राज्यातील गद्दार सरकारची वर्षपूर्ती येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी २० तारखेला गुवाहाटीला जाण्याचं तिकीट दिलं, तर सांभाळून राहा,अशी मिश्किल टीका राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघातील लोकांना सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. सांभाळून राहा, २० जूनला कुणाला रॅडिसन हॉटेलचं तिकिट दिलं तर जाऊ नका असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात नागरिकांशी संवाद साधत होत्या त्यावेळी त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

[ABP MAJHA]महाराष्ट्रात येऊन मिजास दाखवायचा नाही, ...
[sarkarnama]केंद्रीय मंत्र्यांचा बारामती दौरा ; सु...