1 minute reading time (257 words)

[loksatta]“मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे आज…”

 “मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे आज…”

सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला

भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा मतदार संघात रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा १० हजार ५०० मतांनी पराभव केला आहे. या निकालानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपाला टोला लगावला आहे. पैशांच्या जोरावर मराठी माणसाला विकत घेता येत नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मूळचे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातले आहेत. त्यांचा विजय हा आनंद द्विगुणित करणारी बाब आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केलेल्या संघटित प्रयत्नांचा हा विजय आहे. मराठी माणूस पैशांत विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. राजकीय पक्षापेक्षा हा विजय कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे या विजयाचं खरं श्रेय कार्यकर्त्यांना जातं असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं असून भाजपाला टोला लगावला आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं आहे.

२८ वर्षे भाजपचा बालकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघात सत्तांतर झालं आहे. रविंद्र धंगेकर यांना एकूण ७३ हजार १९४ इतकी मते मिळाली असून त्यांनी ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. भाजपासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो आहे. कारण भाजपाने ही निवडणूक जिंकण्यासाठी सगळी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र या निवडणुकीत भाजपाला पराभव सहन करावा लागला आहे.

[Sarkarnama]रवींद्र धंगेकर यांच्या विजयावर सुप्रिय...
[Lokmat News18]'रविंद्र धंगेकरांचा विजय हा दडपशाही...