2 minutes reading time (350 words)

[Tv9 Marathi]पांडुरंगा काय दिवस बघायला मिळत आहेत महाराष्ट्रात.. सुप्रिया सुळे यांनी जोडले थेट हात, म्हणाल्या..

 पांडुरंगा काय दिवस बघायला मिळत आहेत महाराष्ट्रात.. सुप्रिया सुळे यांनी जोडले थेट हात, म्हणाल्या..

साताऱ्यातील प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांना भाजपाच्या मंत्र्यांकडून थेट रस्त्यावर मारहाण करण्यात आली. काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार यादरम्यान आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याबद्दल आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी शंभुराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला. शंभुराज देसाई काल विधीमंडळात जे बोलले ते धक्कादायक होते, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, एका कॅबिनेट मंत्र्याला मारहाण कशी होते? या घटनेचा निषेधच आहे. कोणाच्याही मनमर्जीने हा देश चालणार नाही. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालणार. हा पोलिसांचा संबंध नाही. त्याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या मागे जी शक्ती होती ती त्या अदूश्यशक्तीचा ताकद आहे. हे पोलिसांना करायला लावले नाही तर महाराष्ट्रातील पोलिस असे करणारच नाहीत, असा माझा विश्वास आहे.

पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी मुख्यमंत्र्यांना याबद्दलचे पत्र लिहिणार आहे. काल मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत चर्चा केली. कारण दिल्लीतील वर्मतमान पत्रांमध्ये काही बातम्या आल्या आहेत. पण महाराष्ट्रासाठी हे दुर्देव आहे, जी काही साताऱ्याच घटना झाली. लोकशाहीची हत्या आहे. हा मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असा विषयच नाहीये.

ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत अशी गुंडागर्दी होणार असेल तर त्याच्यापुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय आहे. उद्या परत 10 ठिकाणी होईल, मुळात म्हणजे असे करणेच चुकीचे आहे. मी शंभूराजेंनाही फोन करणार आहे आणि मी मकरंद पाटलांना फोन करून अगोदरच सर्व माहिती घेतली आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, शंभुराज देसाई आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली असेल तर याची चाैकशी व्हायला पाहिजे, दोघेही कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करतंय. पाडुरंगा काय दिवस बघायला मिळत आहेत, महाराष्ट्रामध्ये. तेही मित्र पक्षांनाच ते त्यांचे मित्र पक्षच आहेत ना? असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. 

...

पाडुरंगा काय दिवस बघायला मिळत आहेत महाराष्ट्रात.. सुप्रिया सुळे यांनी जोडले थेट हात, म्हणाल्या.. - Marathi News | MP Supriya Sule has condemned the Satara incident | TV9 Marathi

खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे यांनी सातारा प्रकरणावरून भाजपाला टार्गेट करत गंभीर आरोप लावले. यासोबतच सातारा प्रकरणाची चाैकशी झालीच पाहिजे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
[Sansad TV]LS | Supriya Sule | The Transgender Per...
[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIV...