1 minute reading time (80 words)

[Zee 24 Taas]'उरणची घटना हे गृहमंत्रालयाचं अपयश'

'उरणची घटना हे गृहमंत्रालयाचं अपयश'

सुळेंची सरकारवर जोरदार टीका

रायगडच्या उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीचे अवयव कापून तिची हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगतच्या या तरुणीची मृतदेह सापडला. यशश्री शिंदे असं मृत तरुणीचं नाव आहे. दरम्यान या घटनेचा सर्वच स्तरातून या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या निषेधार्थ उरण शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याप्रकरणी तपासाची चौकशी करण्याची मागणी केली असून उरणची घटना हे गृहमंत्रालयाचं अपयश असल्याची टीका केली आहे. 

[Zee 24 Taas]राज्याचा विरोधी पक्षनेता नाव बदलून वि...
[My Mahanagar]अजित पवार नाव आणि वेश बदलून कसे गेले...