1 minute reading time (130 words)

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट

सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट

 शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इतर सहकारी खासदारांसह अमित शहा यांची भेट घेतली होती. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना सुळे यांनी म्हटले होते की, 'केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात शासन व्हावे ही मागणी मांडली. बीड जिल्ह्यातील स्व महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपासात कसलीही प्रगती होताना दिसत नाही. स्व. मुंडे यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर गजाआड करुन त्यांना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका मांडली. फलटण येथे झालेल्या स्व. डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषी व्यक्तींना शासन व्हावे व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली. यासोबतच महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांची दूरवस्थेबाबत माहिती देऊन राष्ट्रीय आपत्तीनिवारण कोषातून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत करावी अशी मागणी केली.

[TV9 Marathi]आधी सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अ...
[ABP MAJHA]फलटण डॉ. प्रकरणी सुप्रिया सुळेंनी घेतली...