1 minute reading time (134 words)

[News18 Lokmat]Mumbai, Delhi विमानतळ, एअरलाईन्ची चौकशी झाली पाहिजे - सुळे

Mumbai, Delhi विमानतळ, एअरलाईन्ची चौकशी झाली पाहिजे - सुळे

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून वाद होतानाचे चित्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कशी गुप्तपणे भेट घेतली, याबाबत खुलासा केला होता. मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून ते किमान 10 ते 12 वेळा वेश बदलून कसे गेले होते हे त्यांनी सांगितले होते. तसेच त्यावेळी ते बनावट नावाने गेल्याचे देखील उघड केले होते. त्यावरून आता या चर्चांना उधान आले आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टच्या चौकशीची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्र्यांना विमानाने कसे चोरून गेले, याबाबत चौकशी व्हायलाच पाहीजे. असे काय यांच्यात शिजत होते की, चोरून भेटायला गेले होते. तसेच असे बनावट नावाने जर गेले असतील, तर असे कृत्य कोणीही आंतकवादी देखील करु शकतात, त्यामुळे धोका निर्माण नाही होणार का ? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. 

[Time Maharashtra]अजित पवार वेश बदलून कसे गेले? सु...
[Zee 24 Taas]राज्याचा विरोधी पक्षनेता नाव बदलून वि...