[TV9 Marathi]पुरंदरच्या अंजिराची मोदींनी घेतली दखल, Supriya Sule यांनी FB पोस्ट करुन दिली माहिती
दिल्ली येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील पुरंदरचे अंजीर देशाच्या वेगवेगळ्या बाजारपेठेत मिळत असल्याचा उल्लेख केला आहे. जो शेतकरी एकेकाळी स्थानिक बाजारपेठे पुरताच मर्यादित होता, त्यांची उत्पादने आज जगाच्या बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. पुलवामा मधील स्नो पिक्स, काश्मीर मधील क्रिकेट बॅट आणि पुरंदरचा अंजीर जगाच्या बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. अशा शब्दात पुरंदरच्या अंजीराचा एकप्रकारे गौरव केला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या अम्रुत्महोत्सवी वर्षानिमित्त २०२२ मध्येच "फिलेटेली" दिनाच्या मुहूर्तावर टपाल तिकिटावर पुरंदरच्या अंजिराचे चित्र प्रकाशित करून सर्व देशभर आणि जगभर पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या कौतुकाने पुरंदर मध्ये अंजिरावर प्रक्रिया उद्योग आणि व्यापार वाढण्याचे नक्कीच संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुरंदर मधील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी गौरवाची बाब आहे.