1 minute reading time (69 words)

[ABP MAJHA]महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं- सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं- सुप्रिया सुळे

महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद्राने तत्काळ मदत करण्याची गरज आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

[Maharashtra Times]महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अड...
[LOKMAT]अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा-सुप्...