1 minute reading time (110 words)

[Saam TV]हिट अँड रनच्या घटना वाढण्यामागील नेमकं कारण काय? सुळेंचा सवाल

हिट अँड रनच्या घटना वाढण्यामागील नेमकं कारण काय? सुळेंचा सवाल

ट्रिपल इंजिन सरकार काहीही करेल. जे सत्तेत आहेत ते ब्लॅकचे व्हाइट करण्याची एजन्सी झाली असल्याची सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपच्या काही लोकांनी आंदोलन केले, पण कधी कॉम्परोमाईज केलं नाही. हा नवीन भाजप असल्याचे सुळे म्हणाल्या. मुंबई हिट अँड रन प्रकरणावरही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस महिलेचे अश्रू सरकारला दिसत नाही का? पुण्यात पेट्रोल अंगावर टाकण्याचा प्रकार घडला, वर्दीची भीती नाही का? असे सवाल सुळे यांनी केले. सरकार काही करु शकत नाही हे त्यांना माहीत आहे. हे भ्रष्टाचाराने बरबटलेलं सरकार आहे. 10 महिन्यांपूर्वी कांद्याच्या धोरणाबाबत माझा युक्तिवाद झाला होता. त्यावेळी पियुष गोयल यांनी आम्ही धोरण बदलणार नाही असे सांगितले होते. आज त्याच्यांच मित्रपक्षाचे उपमुख्यमंत्री कांद्यावर बोलत असल्याचे सुळे म्हणाल्या. 

[Mumbai Tak] Ajit Pawar यांच्या काटेवाडीतील घरी Su...
[maharashtra mirror]खत दुकानदारांनो खबरदार !