1 minute reading time (208 words)

[mahaenews]‘आमच्या कुटुंबात दिल्लीची अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकते’

‘आमच्या कुटुंबात दिल्लीची अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकते’

सुप्रिया सुळे यांचं विधान

पुणे : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. यानंतर दोन्ही गटांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही चर्चा कोण करते हे तुम्हाला माहीत आहे. आमच्याच कुटुंबीयांपैकी किंवा मला माहीत नाही कोणता चेहरा माझ्या विरोधात उभा राहणार आहे. आमच्या कुटुंबात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीची अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकते.

लोकशाहीमध्ये कोणी तरी माझ्या विरोधात लढलेच पाहिजे, तर त्या निवडणुकीमध्ये मजा आहे. तीन वेळा भाजप उमेदवाराविरोधात लढून मी जिंकले असून, आता चौथ्यांदा माझ्या विरोधात लढणाऱ्या उमेदवाराचे स्वागतच करते. कॉपी करून उत्तीर्ण होण्यापेक्षा गुणवत्तेवर उत्तीर्ण होण्यामध्ये मजा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजितदादांना योग्य वेळी पाच वर्षे मुख्यमंत्री करण्याची आम्हाला संधी मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्या वेळी दादा मुख्यमंत्री होतील, त्या वेळी मी देवेंद्रजींना एकच विनंती करेन, की दादाला पहिला हार घालण्याची संधी मला द्या. मोठा भाऊ या नात्याने मित्रपक्षासाठी मुख्यमंत्रिपदाचा मोठा त्याग करत आहे. त्याबद्दल भाजपचे मनापासून आभार मानते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[ABP MAJHA]अजितदादा बहिणीला काय दिवाळी गिफ्ट देणार...
[sarkarnama]सुप्रिया सुळेंचा 'महाशक्ती'वर शाब्दिक ...