1 minute reading time (88 words)

[Maharashtra Times]मला जे अजितदादा आठवतात, त्यांना दिल्लीला जायला आवडायचं नाही : सुळे

मला जे अजितदादा आठवतात, त्यांना दिल्लीला जायला आवडायचं नाही : सुळे

जागावाटपाच्या चर्चांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दादांना टोला मारला. त्या म्हणाल्या, काही लोक दिल्लीला जातात असं कानावर येत आहे. मला जे अजितदादा आठवतात. त्यांना दिल्लीला जायला आवडायचं नाही कधी. ते दिल्लीला कशासाठी गेले आहेत, हे मला माहिती नाही. कारण माझा त्यांच्याशी संपर्क नाही. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील डेंगळे गार्डन येथे सवांद कार्यकर्ता मेळावा पार पडला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

[Mumbai Tak]Baramati मध्ये Yugendra Pawar रिंगणात ...
[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांची नाव न घेता अजित प...