1 minute reading time (109 words)

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळेंकडून अदानींचं कौतुक; काय म्हणाल्या पाहा?

सुप्रिया सुळेंकडून अदानींचं कौतुक; काय म्हणाल्या पाहा?

उद्योजक गौतम अदाणी हे माझ्यासाठी केवळ उद्योगपती नाहीत, तर भावाप्रमाणे आहेत. माझ्या आयुष्यातील कडू असो वा गोड, प्रत्येक महत्त्वाची बातमी मी हक्काने याच भावाला सांगते. कधी ते भाऊ म्हणून रागावतात, तर कधी प्रेमाने कौतुकही करतात, असे भावनिक उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेमार्फत उभारण्यात आलेल्या 'विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या जागतिक दर्जाच्या केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडाणी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अदाणी समूहाच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रमुख प्रीती अदाणी, खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

[News18 Lokmat]AI शिक्षकांची जागा घेणार? सुप्रिया ...
[ABP MAJHA]गौतम अदानी मोठ्या भावासारखे, सुप्रिया स...