1 minute reading time (178 words)

[sakal]मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ द्या

मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ द्या

पुणे - महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर लोकसभेत चर्चा करण्यासाठी वेळ मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक्स या (पुर्वाश्रमीचे ट्विटर) सामाजिक माध्यमांद्वारे केली आहे.महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा व धनगर हे दोन्ही समाज या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे हे विषय संसदेत मांडले जाणे आवश्यक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची बहुमतातील सत्ता असूनसुद्धा या मराठा व धनगर या दोन्ही समाजांचा आरक्षणाचा प्रश्न जशाच्या तसा कायम आहे. यामुळे या दोन्ही समाजात प्रचंड अस्वस्थता आहे, यातूनच महाराष्ट्रात तरुण आत्महत्या करु लागले आहेत, असे सुळे यांनी म्हटले आहे.

...

Supriya Sule : मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ द्या maratha dhangar lingayat reservation loksabha discussion time supriya sule om birla | Sakal

महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
[All India Radio]बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व...
[hindustantimes]उत्सव नात्यांचा.. सुप्रिया सुळेंनी...