[Saam tv]भर चौकात महिलेला मारहाण, सुप्रिया सुळे संतापल्या
महिला सुरक्षित आहे का? म्हणत साधला सरकारवर निशाणा
Supriya Sule: ' राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Viral Video)
आज (शनिवारी) नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली. कार ओव्हरटेक केली म्हणून त्या महिलेला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. महिलेला मारहाण करताना एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत इंदोरा चौकाजवळ दुचाकी चालक महिला आणि कारचालक पुरुषामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. महिला आपल्या दुचाकीने जात होती. त्यावेळी महिलेने समोर असलेल्या चारचाकीला ओव्हरटेक केलं. त्यानंतर त्या कारचालकाने महिलेला बेदम मारहाण केली. शिवशंकर श्रीवास्तव असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. ही घटना दुपारी एक वाजता इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कार चालक इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात होता. दरम्यान, मागून दुचाकीवरून येणाऱ्या महिलेने त्याला ओव्हरटेक केले. महिला पुढे गेल्याने आरोपी कार चालकाने तिला शिवीगाळ केली. हे ऐकून महिला गाडीतून खाली उतरली आणि आरोपीशी वाद घालू लागली. दोघांमध्ये सुरू झालेला वाद इतका वाढला की हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. आरोपीने कारमधून खाली उतरून महिलेवर हल्ला केला. याच प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी संबंधित व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, असं म्हटलं आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे. https://t.co/EG2PlmcB6J
— Supriya Sule (@supriya_sule) March 18, 2023
