2 minutes reading time (349 words)

[lokmat]गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत जनतेने का चुकवावी? - सुळे

गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत जनतेने का चुकवावी? - सुळे

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अभिषेक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ते शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. हल्लेखोर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. एका लोकप्रतिनिधीची अशी हत्या झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचाच दाखला देत विरोधक सरकारला लक्ष्य करत आहेत. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची सोशल मिडियावर लाईव्ह सुरू असताना गोळीबार करुन हत्या करण्यात आली. नेत्यांवर गोळीबार होण्याची ही महिन्यातील दुसरी वेळ. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या राज्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे अधिकृतपणे 'गुंडाराज' सुरु झाले आहे का? नेत्यांचे दिवसाढवळ्या खून पडत आहेत. याचाच अर्थ राज्याच्या गृहमंत्री महोदयांचे त्यांच्या स्वतःच्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी?

पोलिसांनी मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे. "मॉरिस खूपदा म्हणायचा, मी अभिषेकला सोडणार नाही, मी त्याला संपवणारच. पण मी मॉरिसच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही\", असे त्याच्या पत्नीने सांगितले. काही महिन्यांपूर्वीच मॉरिसला बलात्कार प्रकरणी अटक झाली होती. तो अनेक महिने तुरुंगात होता. 

दरम्यान, मुंबईच्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीनं त्याच्या कार्यालयात अभिषेक घोसाळकर यांना बोलावले. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करत आता दोघांमधील वाद संपल्याचं सांगितले. मात्र त्याच लाईव्हमध्ये मॉरिसने अभिषेकची गोळ्या मारून हत्या केली. त्यानंतर आरोपी मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या मारून आत्महत्या केली. ", 

...

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण: गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत जनतेने का चुकवावी? - सुळे - Marathi News |  MP Supriya Sule criticizes Home Minister Devendra Fadnavis over Abhishek Ghosalkar murder case  | Latest maharashtra News at Lokmat.com

 MP Supriya Sule criticizes Home Minister Devendra Fadnavis over Abhishek Ghosalkar murder case . Abhishek Ghosalkar Murder: अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरून राज्याचे राजकारण तापले आहे. - Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest maharashtra news in Marathi at Lokmat.com
[abplive]गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वस...
राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्तुत-'टू द पाॅईंट' पाॅडका...