1 minute reading time (114 words)

[SAI NEWS 24]सुप्रियाताईंचे हेलिकाँप्टर अचानक साईदरबारी; म्हणाल्या,चमत्काराची अपेक्षा

सुप्रियाताईंचे हेलिकाँप्टर अचानक साईदरबारी; म्हणाल्या,चमत्काराची अपेक्षा

राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे अचानक शिर्डीत आल्या. स्थानिक नेत्यांनी पळापळ करत साईदर्शनाची व्यवस्था केली अन् त्या साईंसमोर नतमस्तक झाल्या. कार्यक्रम नियोजित नसला तरी, मला दर्शनाला बोलावणे हा दैवी चमत्कारच असावा, अशी अपेक्षा सुप्रियाताईंनी व्यक्त केली. त्याचे झाले असे, पुण्यावरून पारोळा येथे माजीमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या सभेसाठी सुप्रियाताई हेलिकॉप्टरने निघाल्या होत्या. मात्र ढगाळ वातावरणामुळे प्रवासात व्यत्यत आला अन् पायलटने संभाजी नगर किंवा शिर्डीत उतरावे लागेल असे सुचविले. त्यावर सुप्रियाताईंनी शिर्डीत उतरणे पसंत केले आणि अचानक साईंच्या दर्शनाचा योग जुळवून आणला. दुपारी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी दर्शनाची अचानक धावपळ करत सर्व व्यवस्था केली आणि सुप्रियाताईंचे दर्शन करुन दिले. त्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा साईबाबांची मूर्ती व शाल देत सत्कार करण्यात आला

[ahmednagarlive24]ट्रिपल इंजिन सरकारमधील मंत्र्यां...
[SP 24 TAAS]खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर ...