1 minute reading time (112 words)

[TV 9 Marathi]Supriya Sule यांचा Vaishnavi Hagawane यांचा आईवडिलांशी फोनवर संवाद

Supriya Sule यांचा Vaishnavi Hagawane यांचा आईवडिलांशी फोनवर संवाद

पुण्यातील (pune) वैष्णवी हगवणे मृ्त्यूप्रकरणात आत्तापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या आरोपींचे लाड पोलिसांकडून पुरवले जात आहेत. आरोपींना तुरुंगात धाब्यावरुन जेवण मिळत असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांना केला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी व्हिडिओ कॉलद्वारे वैष्णवीच्या वडिलांना फोन करुन मी तुमच्या पाठीशी आहे, खंबीरपणे आपण या प्रकरणात लढणार आहोत, असे म्हणत धीर दिला. त्यावेळी, वैष्णवीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, वैष्णवीच्या आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, ते सध्या फरार असून पोलीस शोध घेत आहेत. सासरच्या जाचाला कंटाळूनच आपल्या लेकीनं जीवन संपवल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केल्यानंतर हगवणे कुटुंबातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  

[Maharashtra Lokmanch]गिनीज रेकॉर्ड होल्डर मनस्वीच...