[policenama]सुप्रिया सुळे संतापल्या, ही गोरगरीब जनतेची क्रूर थट्टा
'आनंदाचा शिधा'मध्ये निकृष्ट तेल, डाळीत किडे, तर रव्यात…'
मुंबई : NCP MP Supriya Sule | दिवाळीच्या सणासाठी राज्य सरकारने (State Govt) गोरगरिबांना १०० रुपयांत आनंदाचा शिधाचे (Anandacha Shida) वाटप केले. सरकारने याची मोठी जाहिरात देखील केली. पण प्रत्यक्षात दिवाळीच्या या शिधामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य देण्यात आल्याने ऐन दिवाळीत राज्यातील गोरगरीब जनतेची सरकारने क्रुर थट्टा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केला आहे. यापूर्वी देखील आनंदाचा शिधाबाबत तक्रारी समोर आल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी निकृष्ट दर्जाच्या आनंदाचा शिधाचे फोटो फेसबुक या सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यासोबत आपला संताप व्यक्त करणारा मजकूर लिहिला आहे.
यात सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे की, गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिलेला आनंदाचा शिधा हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले.
राज्य सरकारचा निषेध करताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, ही गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे.
गोरगरीबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध.
दरम्यान, आनंदाचा शिधामध्ये देण्यात येत असलेल्या साहित्याच्या पाकिटावरील छापील वजनापेक्षा कमी वजनाचे साहित्य
असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)
आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मागील वेळी केला होता.
गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला 'आनंदाचा शिधा' हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले. हि गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे. गोरगरीबांच्या दिवाळीची अशी… pic.twitter.com/IgRFifh6Ta
— Supriya Sule (@supriya_sule) November 15, 2023