1 minute reading time
(70 words)
[TV9 Marathi]Supriya Sule यांनी गाडीतून उतरत Sharad Pawar यांची भेट घेतली
पायाला भिंगरी लावून फिरणारे नेते अशी शरद पवारांची ओळख आहे. शरद पवार सातत्यानं दौऱ्यावर असतात. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतात. बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. याच बारामतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांशी यांची त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत भेट झाली. विशेष म्हणजे यावेळी सुप्रिया सुळेदेखील वडिलांप्रमाणेच दौऱ्यावर होत्या. वडिलांची भेट घेण्यासाठी लेकीनं वाहनांचा ताफा थांबवला. यानंतर काही वेळ रस्त्यातच बापलेकीच्या गप्पा रंगल्या. यावेळी शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभादेखील होत्या.