[etv bharat]महागाईवरून सुप्रिया सुळे आक्रमक
बेरोजगारीवरुन मोदींवर टीकेची झोड
राज्य सरकारच्या चुकीची धोरण आणि देशात वाढणारी महागाई बेरोजगारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे यासोबतच सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या समाज उपयोगी योजनांची स्तुतिही वेळोवेळी केलेली पाहायला मिळाली आहे
देशातील पेट्रोल, दूध, डाळी व इतर धान्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. गेल्या सहा महिन्यांमध्ये दूधाच्या दरात तब्बल १२ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली असून जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. pic.twitter.com/Uf4sLQ7grG
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2023
महागाईवरुन सुळेंची सरकावर टीका
सातत्याने वाढणाऱ्या महागाईवर सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा थेट केंद्र सरकारवर टीका केली आहे महागाई संदर्भात त्यांनी एक ट्विट करून सध्याच्या महागाईचा आरसा केंद्र सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे भविष्यात महागाईचे स्वरूप काय असेल असे ट्विट त्यांनी केले आहे सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आवश्यक पावले उचलावीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याची मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे
सामान्याना दिलासा द्या
सध्या महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे महागाईतून देशातील जनतेला दिलासा मिळावा यासाठी तात्काळ मोठी पावले केंद्र सरकारने उचलायला हवीत असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत देशातील पेट्रोल दूध डाळी इतर धान्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते आहे गेल्या सहा महिन्यांमध्ये दूधाच्या दरात तब्बल १२ रुपयांची वाढ झाली होती पेट्रोलडिझेलच्या दरांनी शंभरी गाठली असून जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी झाले मात्र तरी देखील त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना अद्याप मिळालेला नाही
आयात निर्यात कोलमडली
देशात आयातनिर्यातीचे गुणोत्तर पुर्णत कोसळले आहे तसेच देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या उत्पादनांमध्ये घट झाली आहे याखेरीज चलनवाढीचा दर साडेसहापेक्षा जास्त झाला आहे असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे या गंभीर बाबी असून आगामी काळातील देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना यावरुन येते असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
बेरोजगारीवरुन मोदींवर टीकेची झोड
वाढती महागाई बेरोजगारी या मुद्द्यावर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारचा विरोध केला आहे वेळोवेळी राज्यभर केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केली आहेत खास करून घरगुती गॅसचे वाढते दर इंधनाच्या वाढत्या दरांना लक्ष करत केंद्र सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल केला आहे सध्याही महागाईचा दर वाढत चालला आहे गॅस इंधनाचे दर वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो आहे यावरुन राष्ट्रवादीने मोदीसरकारवर वांरवार टीका केली आहे
