[my mahanagar]आगामी काळात देशात महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना येते – सुप्रिया सुळे
मुंबई : आगामी काळातील देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना येत असून यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आवश्यक ती पावले उचलून नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (One can imagine what will be the picture of inflation in the country in the future says mp Supriya Sule)
देशातील पेट्रोल, दूध, डाळी व इतर धान्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. गेल्या सहा महिन्यांमध्ये दूधाच्या दरात तब्बल १२ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली असून जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. परंतु तरीदेखील त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना अद्याप मिळालेला नाही. देशातील आयात-निर्यातीचे गुणोत्तर पुर्णतः कोसळले आहे. देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या उत्पादनांमध्ये घट झाली आहे. याखेरीज चलनवाढीचा दर साडेसहापेक्षा जास्त (६.५२) इतका झाला आहे याकडेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लक्ष वेधले आहे.
देशातील पेट्रोल, दूध, डाळी व इतर धान्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. गेल्या सहा महिन्यांमध्ये दूधाच्या दरात तब्बल १२ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली असून जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. pic.twitter.com/Uf4sLQ7grG
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2023
या अतिशय गंभीर बाबी असून आगामी काळातील देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना यावरुन येऊ शकते असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
दरम्यान, डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत घाऊक महागाई ४.९५ टक्क्यांवरून ४.७३ टक्क्यांवर आली आहे. महागाई दर १५ एप्रिल २०२१ रोजीच्या नीचांकी पातळीवर आला आहे. जानेवारी २०२३ मध्ये महागाईच्या दरात घट प्रामुख्याने खनिज तेल, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कापड, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, वस्त्रे आणि अन्न उत्पादनामुळे झाली आहे.