1 minute reading time (93 words)

[TV9 Marathi]अजित पवारांचा फोटो पाहताच सुळे यांच्या डोळ्यात पाणी

अजित पवारांचा फोटो पाहताच सुळे यांच्या डोळ्यात पाणी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असं एकीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे वारंवार निक्षून सांगत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार-मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्याने सगळेच संभ्रमात आहेत. मात्र नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे हे पवार कुटुंबीय अनेकदा अधोरेखित करत आलेत. सुप्रिया सुळेंनी जेव्हा अजित पवार हे आजही आमचे नेते आहेत, असं सांगितलं होतं, तेव्हा त्यावर स्पष्टीकरण देताना शरद पवारांनी सुप्रिया सुळे-अजित पवार यांच्यातील बहीण-भावाच्या नात्यामुळे त्या तसं बोलल्याचं म्हटलं होतं. दादा-ताईंमधील याच नात्यातील हळवेपणाची साक्ष देणारे क्षण 'खुपते तिथे गुप्ते' या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात पाहायला मिळाले.

[ABP MAJHA]एक हजारो में मेरी बहना...दादांचा फोटो, ...
[Lokmat Filmy]अजितदादांना पाहतांच सुप्रिया सुळेंचे...