1 minute reading time (67 words)

[TV9 Marathi ]सुप्रिया सुळे यांची गाडी थांबवत शेतकऱ्यांनी गाऱ्हाणं मांडली

 सुप्रिया सुळे यांची गाडी थांबवत शेतकऱ्यांनी गाऱ्हाणं मांडली

 सोलापूर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असताना माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी थांबवत आपल्या अडचणी सांगितल्या. त्याचबरोबर राज्य शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे सांगितले. तसेच शेतकरी प्रश्नावर आपण संसदेत आवाज उठवावा अशी विनंती केली. यावेळी आडत व्यापाऱ्यांनीही आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी त्यांच्या प्रश्नावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुळे यांनी दिले. यावेळी शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी  चटणी भाकरी दिली. त्यांनी आपुलकीने दिलेल्या भेटीचा सुळे यांनी स्विकार केला.

[tv9marathi]भारतीय जनता पक्ष नसून हा तर…
[ABP MAJHA]पंधरा वर्षे प्रेम आणि आशीर्वाद दिले पुढ...