1 minute reading time (218 words)

[Sakal]राज्यपालांच्या राजीनाम्याने, उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला; सुप्रिया सुळे

उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला-सुप्रिया सुळे

खडकवासला : उच्च पदस्थ बसलेल्या व्यक्तीकडून महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान व राज्यातील महापुरुषांचा अपमान केला. देर आए, दुरुस्त आए, उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला. अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

 वारजे परिसरातील माजी नगरसेविका सायली वांजळे यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र व राज्यातील जनतेचा अपमान केला जात होता.

तो कुणालाच मान्य नव्हता. फक्त भारतीय जनता पक्षाला मान्य होता. त्या व्यक्तीचा फायनली राजीनामा मंजूर झालाय. विरोधी पक्ष नेहमीच त्यांच्या विषयी आक्रमक होता. इडी (एकनाथ व देवेंद्र) सरकारने महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा एवढा मान सन्मान केला. हे अतिशय दुर्दैवी आहे.

नवीन राज्यपाल रमेश बैंस यांना खासदार सुळे यांनी मनापासून शुभेच्छा देत त्यांनी सविधांनाच्या चौकटीत राहून काम करावे. महाराष्ट्रात त्यांचा स्वागतच होईल. दहा वर्षे ते माझ्यासोबत खासदार होते. नवीन राज्यपालांचं काम मी संसदेत जवळून पहिलं आहे. अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात जे झालं त्याची पुनरावृत्ती होणार नाही. ही अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली.

...

Supriya Sule : राज्यपालांच्या राजीनाम्याने, उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला; सुप्रिया सुळे | Sakal

उच्च पदस्थ बसलेल्या व्यक्तीकडून महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान व राज्यातील महापुरुषांचा अपमान केला. Supriya Sule over Governor resignation sooner or later Maharashtra got justice politics
[TV9 Marathi]महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघ...
[TV9 मराठी]नवीन राज्यपाल Ramesh Bais यांनी संविधान...