1 minute reading time (271 words)

[sarkarnama]ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोण-कोण? सगळ्यांची नावं उघड करा

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोण-कोण? सगळ्यांची नावं उघड करा

सुप्रिया सुळेंची मागणी

Maharashtra Politics News : 'कुठलीही ड्रग्जची केस असेल, तर या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली पाहिजे. मी गुटखा, तंबाखूविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. ड्रग्जच्या प्रकरणात कुठलंही राजकारण येऊ नये. जे कुणाचं सरकार असेल त्यांनी स्ट्राँग अॅक्शन ड्रग्जसंबंधित प्रकरणात घेतलीच पाहिजे. ही माझी आग्रहाची भूमिका आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कालची पत्रकार परिषद मी पाहिली. या प्रकरणातील सर्वांचे संबंध उघड होतील, असं फडणवीस म्हणाले. यामुळे गृहमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी हे ड्रग्ज रॅकेटचं प्रकरण महाराष्ट्र आणि देशासमोर उघड करावं.

आणि या ड्रग्ज प्रकरणात तातडीने कारवाई करून महाराष्ट्राने देशाला दिशा द्यावी. फक्त भाषण करून चालणार नाही. गृहमंत्र्यांनी कृतीतून दाखवून द्यावं, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 'ललित पाटील प्रकरणात गृहमंत्र्यांनी कारवाई करावी. जो कोणी ड्रग्ज रॅकेटमध्ये असेल किंवा यात सक्रिय असेल, त्याविरोधात पूर्ण ताकदीने आम्ही गृहमंत्र्यांसोबत उभे राहू. म्हणूनच गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर या प्रकरणातील नावं उघड करावीत', अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

ललित पाटील प्रकरणावर काय म्हणाले होते, फडणवीस?

'ललित पाटील हातात आला आहे. निश्चितच त्यातून अनेकांचे संबंध बाहेर येतील. काही गोष्टींची आताच मला मिळाली आहे, पण त्यात लगेच सांगता येणार नाही. योग्य वेळी मी सांगेन. पण एक मोठं रॅकेट यातून उघड होईल. ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो, यातून जे उघड होणार आहे', त्यातून सगळ्यांची तोंडं बंद होतील, असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केलं.

...

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून राजकारण तापलं आहे.| Supriya Sule On Lalit Patil Drug Case

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोण-कोण? सगळ्यांची नावं उघड करा; सुप्रिया सुळेंची मागणी | supriya sule appeal to devendra fadnavis on lalit patil drug case
[abplive]शशिकांत शिंदेंच्या पुढच्या वाढदिवसाला महा...
[abplive]माझी लढाई फक्त भाजपाविरोधात आहे