[sakal]"त्यांना 48 तासांत..."; दमानियांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंची भुजबळांवर कुरघोडी
मुंबई : छगन भुजबळ यांनी मुंबईतील एका कुटुंबाचं घर लाटल्याचा गंभीर आरोप नाशिक इथल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या पीडित कुटुंबासह त्यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.
पण आता दमानियांच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असून ४८ तासांत पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तीन मुलं आणि एक विधवा आई यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळं आपण सर्वांनी राजकारण बाजुला ठेवून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्याकडं बघावं. अंजली दमानिया यांनी देखील अत्यंत संवेदनशीलपणे हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. (Marathi Tajya Batmya)
फुल ना फुलाची पाकळी मी देखील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळं पुढच्या ४८ तासांत त्या तिन्ही लेकरांना आणि त्यांच्या आईला न्याय मिळेल अशी आपण सर्वजण अपेक्षा करुयात. त्याच्यात कुठलंही राजकारण आणायला नको, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.मी छगन भुजबळांचं एक प्रक्षोभक असं भाषण ऐकलं आणि त्यामुळं माझ्या डोक्यात तिडीक गेली. तळपायाची आग माझ्या मस्तकात गेली. काल ते म्हणाले, आम्ही आमच्या कष्टाचं खातोय. तर ते कुठल्या कष्टाचं खाताहेत त्याचा खुलासा करण्यासाठी आज मी त्यांचं घर मीडियाला दाखवलं.
हे त्यांचं घर नाही तर त्यांनी फर्नांडीस परिवाराचं हे लुटलेलं घर आहे. या कुटुंबाचा एक छोटा बंगला होता, तो बंगला त्यांनी रहेजा बिल्डरला पुनर्विकासासाठी दिला आणि त्यात त्यांना पाच फ्लॅट मिळणार होते, ते पाच फ्लॅट त्यांना कधीही मिळाले नाहीत.अंजली दमानिया यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, "सुपारी घेणाऱ्यांबद्दल मी काहीही बोलणार नाही. नेमकाचं ओबीसींचा लढा सुरु असताना असे आरोप केले जात आहेत"
